आई-बाबा सुविचार | Aai baba Marathi Suvichar Quotes Status

MarathiStyle.com daily update Marathi Suvichar aai baba suvichar quotes in marathi, marathi lekh aai baba, aai baba status shayari, marathi kavita aai baba, marathi quotes on aai baba.

Aai Baba Marathi Suvichar

 आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

 आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

 आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

 जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

 ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

 देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

 प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

 स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली बाबानी शब्दांचा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

 आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

 संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”… आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..

aai baba quotes in marathi | आई-वडील

Aai vadil Marathi Suvichar

 एका आठवड्याचे ‘सात’ वारअसतात. ‘आठवा’ वार आहे “परिवार”; तो ठिक असेल तर सातहीवार ‘सुखाचे’ जातील !!

 हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

Aai Vadil Suvichar | आई वडील वर सुविचार

 आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा…. पण, कोणत्याही गोष्टीसाठी, आई-वडिलांना सोडू नका….

 खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

 स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो… स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो… —–तो एक बाप असतो…..

 आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला देणार सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार आई कोणीच नाही ग माझ आसरा मनाला देणार मायेन रोज कुशित घेऊन झोपणार

 मनाची माया फ़ार निरागस असते..! ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!! जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..! त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

 आई”म्हणजे भेटीला आलेला देव, “पत्नी”म्हणजे देवाने दिलेली भेट आणि”मित्र”म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

हे पण वाचा 👇🏻

मैत्री-दोस्ती मराठी सुविचार

 जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे ” आई”

 आई…… लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही..!

 डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती, डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी, आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई…..

 घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!

 दुखाचा डोंगर कोसळलेला असो कि सुखाचा वर्षाव होत असो मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो कि आठवणीचे तारे लुकलुकत असो आठवते फक्त …..आई….

 जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर, जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी….!

Aai Baba Quotes in Marathi

 आई घराचं मांगल्य असते , तर बाप घराचं अस्तित्व असतो , आईकडे अश्रुचे पाट असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात, ज्योतीपेक्षा समई जास्त तापते, ठेच लागली की आईची आठवण येते, मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप, मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते मुलगी बापाला जाणते….. किती ग्रेट असतो ना बाप…..!

aai baba kavita in marathi
aai baba kavita in marathi

 देवाला pratek thikani जाने जमले नाही… manun tyni आई nirman keli plz lifemadhe kadhihi आईला hert karu nka karan आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले अनमोलं gift आह

 आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा.. आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ.. आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे दयेची सावली.. आई म्हणजे स्वतः उपाशी राहून, आपल्याला भरवणारी.. आई म्हणजे जीवाचं रान करून, आपल्यासाठी राबणारी.. आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे कधी ओरडून समजावणारी.. आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी.. आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..

 पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

 खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य… या जगात कोणती ही मुलगी ही, तिच्या नव-यासाठी त्याची “राणी” नसेल ही कदाचित.. पण..????? तिच्या वडिलांसाठी ती, नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…

 ‘आई’ साठी आई…. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते, आई असत जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही..!

 आई म्हणजे असते एक माये चा पाझर आई ची माया असते एक आनंदाचा सागर

 आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल

 सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई …

 आ म्हणजे आस्था, ई म्हणजे ईश्वर !!

 आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !! आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!!

Aai Vadil Status in Marathi | आई-वडील

 आई म्हणजे मंदिराचा कळस… आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !! आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!! आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

 !! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस पॆक्शाही मॊठा दागिणा आह

 आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा । प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा । क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका । संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा । आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

 जीवनात दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको

 लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो

 आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही

 आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते

 नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय

 पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते

 वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत, पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत

 वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या ‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी ‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो

 आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , आई-बाबा | Aai baba Marathi Suvichar Quotes Status हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment