मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female, marathi ukhane for female, marathi ukhane for male, ukhane in marathi for male, ukhane in marathi for female, marathi ukhane for bride, marathi ukhane for groom, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, ukhane in marathi comedy, marathi ukhane list, long marathi ukhane for female, marathi ukhane navardevasathi, latest marathi ukhane, latest marathi ukhane, marathi ukhane for satyanarayan pooja, marathi ukhane for pooja, marathi ukhane for male funny, marathi ukhane for male romantic, smart marathi ukhane female, smart marathi ukhane male, funny marathi ukhane या संधर्भात माहिती मिळेल.

गोपा देताना घ्यावयाचे उखाणे | Best Ukhane in Marathi for Female | Gopa detana ukhane in marathi

चंद्र तारागणाच्या मेळाव्यात रजनी हसते,

………… बरोबर तोडे घेऊन बारशाला येते

आंब्यांच्या फांदीवर पाय कसा देऊ,
………… बरोबर ………. घेऊन बारशाला येऊ.

सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
……….. बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.

हे पण वाचा 👇🏻
 
मातृत्वाच्या मांगल्याने मान मोहित होते,
…….. बरोबर…….. घेऊन बारशाला येते.
 
 
पतिव्रता धर्म नम्रतेने वागते,
……… बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विनयाने विद्या शोभते,
……..बरोबर……..घेऊन बारशाला येते.
 
तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला नवस करते,
……… बरोबर ……… घेऊन बारशाला येते.

सकाळच्या वेळी अंगणात येतात काऊ, चिऊ,
………बरोबर………घेऊन बारशाला येऊ.

टीप :- पहिल्या……..ठिकाणी पतीचे नाव घेऊन 
दुसऱ्या……… ठिकाणी दागिन्याचे नाव घ्यावे.

 

इंगजी उखाणे | Ukhane in English for Female

 

इंगजी उखाणे | Ukhane in English for Female
इंगजी उखाणे | Ukhane in English for Female

 

फोर प्लस फाइव
इज इक्वल टू नाइन
माय मिस्टर,
………. इज व्हेरी व्हेरी फाइन.

वुलन कोट गोल्डन रिंग,
……… माय डिअर किंग.

बन बदर टू सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.

इंडिया इज माय कंट्री
ऑल इंडियन आर
माय ब्रदर अँड सिस्टर,
……….. इज माय मिस्टर.
 
 
ग्रास इज ग्रीन, माय मिस्टर,
……. इज व्हेरी फाइन.

क्रिकेट इज ब्यूटीफूल गेम,
……….. इज माय मिस्टर्स नेम.

वन बॉटल फोर ग्लास,
……….. इज फसक्लास.

 

वाती सारताना घ्यावयाचे उखाणे | vati sartana ukhane in marathi for female

वाती सारताना घ्यावयाचे उखाणे  vati sartana ukhane in marathi for female
श्रावण महिन्यात सण, उत्सवाची पर्वणी
………चं नाव घेते मी वाती सारण्याचा कारणी.



स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
………..चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.


सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
………चं नाव घेऊन मी वाती सारते.



वेलीला शोभे फूल, स्त्रिला शोभे अपत्य,
………चं नाव घ्यायला वाती सारण्याचं निमित्त.



लक्ष्मी दानात शोभते, विद्या विनयेन शोभते,
……….चं नाव घेऊन मी वाती सारते.



क्षणाची विदयुलता ब्रम्हांड उजळी,
……..चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.


बागेतील फूल पूजेसाठी तोडते,
……… नाव घेऊन वाती सारते.

 

समईतील ज्योती भक्ती-भावाने उजळविते,
……… नाव घेऊन वाती सारते.



समईत लावल्या वाती, उजळल्या ज्योती,
………… नाव घेऊन सारते वाती.



चंद्रोदय होताच संकष्टीला करतात गणेशाची आरती,
……….. चं नाव घेऊन सारते वाती.



दसऱ्याला आपट्याचे पान, हृदय मिलन दर्शविते,
………. चं नाव घेऊन वाती सारते.



आई-वडिलांनी जन्म दिला, ब्रह्मदेवानी बांधल्या गाठी,
……… चं नाव घेते वाती सारण्यासाठी.



महाविष्णूची लक्ष्मी, नीलकंठाची पार्वती,
……… चे नाव घेऊन सारते वाती.

 

फुकडीचे उखाणे | Fukadiche ukhane in marathi for female

फुकडीचे उखाणे | Fukadiche ukhane in marathi for female
फुकडीचे उखाणे | Fukadiche ukhane in marathi for female

सोन्याचा हार मोत्यानी भरा,

फुगड्या खेळा याला प्रारंभ करा.

मामाने दिली सोन्याची बुगडी,
तुझी न माझी पहिलीच फुगडी.

आपण दोघी मैत्रीणी जोडीच्या,
हातात पाटल्या तोडीच्या.

तुझी माझी फुगडी गिरकेदार,
मैत्रीणींना आवडते फार.

साता समुद्रापलीकडे रामाने घेतली अळी,
माझी मैत्रीण गुलाबाची कळी.

मंगळागौरीला वाहिला केवडा,
फुगडी घालून झाली वाट माझी सोडा..

 

आंबाडीची भाजी आंबली कशी, आंबली कशी,
माझी मैत्रीण दमली कशी.

गीतात जसा भाव, फुलात तसा गंध,
मैत्रिणी बरोबर जुळले फुगडी बंध.

 

वधू-वराची गाठ मारताना / सोडताना | vadhu varachi gath martana | sodtana ukhane in marathi for female

वधू-वराची गाठ मारताना / सोडताना | vadhu varachi gath martana | sodtana ukhane in marathi for female
वधू-वराची गाठ मारताना / सोडताना | vadhu varachi gath martana | sodtana ukhane in marathi for female

विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट,
…… च नाव घेऊन बांधते वधू-वराची गाठ.



नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,
…… च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी.



श्रीकृष्ण बसले जेवायला, चांदीचा टाकते पाट,
….. च नाव घेऊन बांधते वधू-वराची गाठ.



विठ्ठलाच्या देवळात भक्ताची दाटी,
…… च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी.



हिरव्या साडीला जरीचे काठ,
…… नाव घेऊन सोडते वधू-वराची गाठ.



रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,
….. च नाव घेऊन सोडते….. च्या गाठी.



नाटकात नाटक गाजलं सुभद्राहरण,
…… च नाव घ्यायला गाठ मारण्याचं कारण.



गोकुळाष्टमीला घरोघरी कृष्णजन्माचा थाट,
…… च नाव घेऊन सोडते वधू-वराची गाठ.



श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरतात ओटी,
….. च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी.



श्रावण महिन्यात सण उत्सवाचे पर्वणी,
….. रावांचं नाव घेते गाठ मारण्याच्या कारणी.



श्री वर्धनी सुपारी अडकित्त्याने फोडते,
….. नाव घेऊन….. ची गाठ बांधते.


 

मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana Ukhane in marathi for female

मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana Ukhane in marathi for female
मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana Ukhane in marathi for female
सीतेच्या पर्णकुटी समोर लावल्या केळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
घरासमोर अंगण अंगणात लावली केळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
घरापुढे अंगण, अंगणात काढली रांगोळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
केळीच्या पानावर केशरी भात,
…… च नाव घेऊन लावते मुंडावळी ला हात.
 
 
स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
हिंद मातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवांडते,
…… च नाव घेऊन मुंडावळी सोडते.
 
 
सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवते,
….. च नाव घेऊन मुंडावळी सोडते.
 
 
नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,
….. च नाव घेते मुंडावळी सोडण्यासाठी.

 

सुपारी सोडताना व ढिगारे मोडताना | Supari sodtana Dhigare modtana ukhane in marathi for female

 

श्यमसावळा कृष्णसखा भक्तांचा कैवारी,

…… च नाव घेऊन सोडते सुपारी.
 
 
मराठ्यांच्या मुलखात भवानी ची वारी,
…… च नाव घेऊन सोडते सुपारी.
 
 
महादेवाच्या मंदिरात पूजा करते दुपारी,
….. च नाव घेऊन सोडते सुपारी.
 
 
एकादशीला करतात भक्त पंढरीची वारी,
…… च नाव घेऊन सोडते सुपारी.
 
 
अंगणात शोभे तुळस, तोरण शोभे दारी,
….. च नाव घेऊन सोडते सुपारी.
 
 
यमुनेच्या काठावर श्रीकृष्ण वाजवी बासरी,
….. च नाव घेऊन सोडते सुपारी.
 
 
महादेवाच्या मंदिरात वाजतात नगारे, 
…… च नाव घेऊन मोडते ढिगारे.
 
 
प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,
….. च नाव घेऊन ढिगारे मोडते .
 
 
मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,
…..  च नाव घेऊन ढिगारे मोडते.
 
 
विठ्ठलाच्या देवळात भक्ताची दाटी,
….. च नाव घेऊन देणारे मोडण्यासाठी.
 
 
स्टीलच्या ताटात ठेवले फणसाचे गरे,
….. च  नाव घेऊन मोडते ढिगारे.
 
 
नवमी दिवशी राम जन्मले दुपारी,
….. नाव घेऊन सोडते सुपारी

 

घास भरवतानाचे उखाणे | Ghas bharvitana

घास भरवतानाचे उखाणे | Ghas bharvitana
घास भरवतानाचे उखाणे | Ghas bharvitana
आनंदाने भरला हा दिन लग्नाचा,
…… ना घास देते गोड जिलेबीचा.
 
 
सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
…… ना देते….. चा घास.
 
 
चांदीच्या तबकात पकवणाची रास,
….. ना देते….. चा घास.
 
 
रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते,
…… चा घास….. ना देते.
 
 
दया, क्षमा, शांती तेथे लक्ष्मीचा वास,
….. ना भरवते….. चा घास.
 
 
लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,
…… घालते…… चा घास.
 
 
महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा वास,
…… ना भरवते….. चा घास.
 
 
गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा,
…… ना घास भरवते….. चा.
 
 
शरयू नदीत जन्म झाला मेघदूताचा,
….. ना घास घालते….. चा.
 
 
संसाराच्या सुख स्वप्नाची स्त्रीच्या मनी आस,
…… ना घालते…… चा घास.

 

कंकन बांधताना /सोडताना | Kankan bandhtana sodtana ukhane in marathi for female

 
आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण,
…… च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
पाण्याच्या हंड्यावर फुलाचे झाकण,
….. च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
वसंत ऋतूत कोकिळा करते कुंजन,
….. च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
चंद्राभोवती तारकांनी धरलं गोल रिंगण,
…… च नाव घेऊन बांधते कंकन .
 
 
राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन,
…… च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
चांदीच्या करड्याला सोन्याचे झाकण
…… च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
अमृतासाठी देव-दानवांनी समुद्राचे केले मंथन,
….. च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
माहेरच्या विद्यालयात वेचले ज्ञानाचे कण,
….. च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
स्वराज्यासाठी शिवरायांनी अर्पिले तन-मन-धन,
….. च नाव घेऊन बांधते कंकन.
 
 
विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी,
….. च नाव घेते कंकन बांधण्यासाठी.

 

मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana ukhane in marathi for female

मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana ukhane in marathi for female
मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana ukhane in marathi for female
सीतेच्या पर्णकुटी समोर लावल्या केळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
घरासमोर अंगण अंगणात लावली केळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
घरापुढे अंगण, अंगणात काढली रांगोळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
केळीच्या पानावर केशरी भात,
…… च नाव घेऊन लावते मुंडावळी ला हात.
 
 
स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
हिंद मातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,
…… च नाव घेऊन सोडते मुंडावळी.
 
 
उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवांडते,
…… च नाव घेऊन मुंडावळी सोडते.
 
 
सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवते,
….. च नाव घेऊन मुंडावळी सोडते.
 
 
नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,
….. च नाव घेते मुंडावळी सोडण्यासाठी.

 

गृहप्रवेशाच्या वेळी घ्यावयाचे उखाणे | Grahapravesh ukhane in marathi for female

आकाशाच्या अंगणात ब्रह्म, विष्णू आणि महेश,

…… च नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.

 

उंबरठ्यावरचे माप, पदस्पर्शाने लवंडते,

…… पत्नी म्हणून गृहप्रवेश करते.

 

उंबरठ्यावर पाय देताच लागली सुखी जीवनाची चाहूल,

…… च नाव घेऊन टाकते घरात पाऊल.

 

सुखाच्या पायर्‍या चढताना नाही दुःखाचा लवलेश,

….. च नाव घेऊन करते गृहप्रवेश.

 

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विनयाने विद्या शोभते,

…… बरोबर गृहप्रवेश करते.

 

मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,

…… च नाव घेऊन ग्रह प्रवेश करते.

 

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,

…… च नाव घेऊन गृहप्रवेश करते.

 

प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,

….. च नाव घेऊन गृहप्रवेश करते.

 

अज्ञातवासात राहण्यासाठी पांडवांनी बदलली वेश,

…… च नाव घेऊन करते गृहप्रवेश.

 

तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला करते नवस,

…… चं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळेस.

Grahapravesh ukhane in marathi for female

 

नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,

…… च नाव घेते गृहप्रवेशासाठी.

 

रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,

…… च नाव घेते गृहप्रवेशासाठी.

 

साता समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ,

…… चं नाव घेते गृहप्रवेशाची वेळ.

 

गांधींनीम्हंटले “चाले जाव”, गोरजेला पळून ।

……… पंतांचेनाव घेते , सगळी पहा वळून ।।

 

आपल्या मुलुखातच व्हायचा आपल्या भाषेचा मान ।

. . . . . . . . . .रावांचेनाव घेते, ऎका देऊन कान ।।

 

…….. लॉज मध्ये राहू, अन राईस-प्लेटखाऊ ।।

. . . . . . . . . .. . .. रावमला संगे न्या, माहेरी किती राहू ।।

 

क्यूनको, कार्डनको,नको कापड-कोटा ।।

…….. …… पंतांच्या शेतीवाडीत, नाही कशाला तोटा ।।

 

गिरिजाशंकर, सीता-राम यांना गुरु करू ।

. .. . . .. . .. . रावआपण दोघे, संसारसागर तरु ।।

 

बापू गेले सांगून, ‘विसरा जात पात’ ।

…….. रावांशीलग्न केले जरी भिन्न जात ।।

 

हिमालयाच्या मुलीनेही म्हातारा नवरा केला ।।

….. पंत बीजवर तरी , संसार सुखाचा झाला ।।

 

उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात ।

हजारांची कंठी . . . . . . . .. .. . . रावांच्या गळ्यात ।।

 

रुपयाची डबी, त्यात अत्तराचा बोला ।

. . . . . . .. .. . रावांचे बोलणे शंभर रुपये तोळा ।।

 

उशाखालचा शेला, पायाखाली गेला ।

उठाउठा   . . . . . . .. . . . पंत, प्रहरभर दिवस आला ।

 

मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला ।

. . . . .. . . . . .. . रावांचेआयुष्य वाढो, हीच प्रार्थना तुला ।।

 

लावीत होते कुंकू, त्यात पडले मोती ।

. . . . . . . . .. . . .पंतासारखा भ्रतारजन्मोजल्मी चिंता ।।

 

कुरूंदाची सहाण, चंदनाचे खोड ।

. . . . . . . . . रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड ।।

 

चंद्राचाझाला उदय , सागराला अली भरती ।

. . . . . . . . . . .. पंतांच्याहृदयात . . . . . देवाचीमूर्ती ।।

 

शिवाजीसारख्या पुत्र, जिजाईसारखी माता ।

   . . . . . . .. . . . रावांचेनाव घेते सर्वांच्याकरिता ।।

 

महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू ।

. . .. .. .. . . . चे नाव घेऊन हिंदमातेचा जयघोष करू ।।


 

गृहप्रवेशाच्या वेळी घ्यावयाचे उखाणे |Grahapravesh ukhane in marathi for female

कॅप्टन लक्ष्मी, नेताजी सुभाषचंद्र बोस ।

. . . . . . . . .चे नाव घेऊन’जय हिंद’ चा करू जयघोष।।

 

बाळ्या बुगड्या गेल्या, अन इयरिंग आले।

कॅप्टन . . . . . .. . . रावांच्याहुकुमाने सैनिक दल चाले ।।

 

स्फोटाने फुटली बोट , त्याने उडाल्या लगडी ।

. . . . . . .. . . रावांच्या डोक्यावर शिंदेशाही पगडी ।।

 

आधी घातला चंद्रहार, मग घातली ठुशी।

…….. . रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच ख़ुशी।।

 

दसऱ्याच्या सणाला केला साखर-भात ।

. . . . . . . . . . रावांचे नाव घेते . . . . . . .पंतांची नात ।।

 

पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर।

   . . . .. . . . रावांच्यासेवेला . . . . . . नेहमीचहजर ।।

 

एक पाय घरात, एक पाय दारात ।

जडावाचे पदक . . . . . . . . रावांच्या हारात ।।

 

लहानशा भिंती , चित्रे काढू किती ।

सासूबाईंच्यापोटी . . . . . . . . . राव मोती ।।

 

सागवानी पेटीला सोन्याची चूक ।

. . . . . . .. . रावांच्या हातात कायद्यांचे बुक ।।

 

शिसवी लाकडाचा देव्हारा , त्यात चांदीची मूर्ती ।

. . . . … . . . रावांचीदेशभक्ती म्हणून सदा कीर्ती ।।

 

काळी  चंद्रकळातिला मोतीचूर पदर ।

. . . . . . . . रावांच्याजीवावर कुंकवाचा गजर ।।

 

चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा ।

 . . . . . . . . . पंतांच्या जिवावर . . .. ..  . मारीमौजा ।।

 

देवापुढे लावला उद , वास सुटला छान ।

  . . . . . . .  पंतांचेनाव घेते , ऐका देऊन कान ।।

 

गौरीहरपुजले अन बोहल्यावर चढले।

. . . . . . . रावांच्यासुखासाठी संसारात गढले ।।

 

मराठांच्या मुलुखात भवानीची वारी ।

सैन्यचालले लढाईवर त्यात . . . . . रावांची स्वारी ।।

 

पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा ।

. . . . . . .. . रावांच्याजिवावर भरला हातात चुडा ।।

 

 सोन्याच्या तारेत गुंफली एकदाणी ।

. . . . . . .रावांचेनाव घेते . . . . . . ची तान्हही ।।

 

काळ्या चंद्रकळेवर ताऱ्यासारख्या टिकल्या ।

 . . . … .. . . रावांच्या मळ्यात खूप तुरी पिकल्या ।।

 

काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके ।

. . . . . . . रावांच्या गालावर कल्याचे  झुपके ।।


 

लग्नात घ्यावयाची उखाणे | smart marathi ukhane for female
लग्नात घ्यावयाची उखाणे | smart marathi ukhane for female
लग्नात घ्यावयाची उखाणे | smart marathi ukhane for female
 
आकाशात उगवला चंद्र, निषेला लागली चाहूल
….. च्या संसारात टाकले पहिले पाऊल.
 
 
माहेरची नाती म्हणजे जणु रेशमाच्या गाठी
रेशिंबंध सोडून सासरी आले….. च्या साठी.
 
 
माहेरची माया पाश सोडून आले आज सासरी
माप ओलांडून प्रवेश करते….. च्या घरी.
 
 
भिल्लीनीच्या च्या नृत्याने शंकर झाले मोहित
संसाराला सुरुवात करते…… च्या सहीत.
 
 
नाव आहे ओठी  पण लज्जेच बंधन
…… चे नाव घेऊन सोडते मी कंकण.
 
 
कळत नाही माझे मला आहे स्वप्न की भास?
….. ना देते मी जिलेबीचा गोड घास.

Ukhane for female 

मनीमानसी चे स्वप्न आज झाले साकार
….. नी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार.
 
 
बरेच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार
….. नी करावा जिलेबीच्या घासा चा स्वीकार.
 
 
शंकराच्या मंदिरामध्ये समोर असतो नंदी
….. च्या संसाराची आज झाली नांदी.
 
 
देवघरातला नंदादीप तेवत ठेवते अखंड
….. ना घास देते मी पुरी आणि श्रीखंड.
 
 
साखरपुडा झाला, लग्न ठरलं ,सर्वांनी केलं अभिनंदन
….. च्या जीवनाचे करेन मी नंदनवन.
 
Ukhane for female 
Ukhane for female 
Ukhane for female  
 
रंगांमध्ये जावे रंगून ,सुरांमध्ये व्हावे दंग
….. चा संसार आदर्श करण्याचा बांधते मी चंग.
 
 
मनासारखा पती मिळावा म्हणून हरितालिके ला पुजल
…… च्या नावाने आज गळ्यात मंगळसूत्र बांधलं.
 
 
कॉम्प्युटरचा शोध लागला ,जग जवळ आलं
…..  व….. च आज थाटात लग्न झालं.
 
 
संसार रुपी निरांजनात लावते प्रीतीची फुलवात
….. च्या साथीने करते संसाराला सुरुवात.

smart marathi ukhane for female

 
जिजाऊच्या पोटी जन्मले शिवाजी सारखे सुपुत्र
….. च्या नावाने गळ्यात घातले मंगळसूत्र.
 
 
सोन्याच्या कोंदणात चमकतो अस्सल हिरा
….. सारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा.
 
 
मंडपात पसरलाय उदबत्त्यांचा सुवास
….. ना देते मी लाडूचा गोड घास.
 
 
लग्न घराच्या वराडाची बसली खाशी पंगत
….. च्या घरी सर्वांची होईल आगत-स्वागत.
 
 
दार अडवून उभी आहे ननंद आणि जाऊ
लाज वाटते बाई मला…… च नाव कसे घेऊ.
 
 
आनंदाने वेचते मी आशीर्वादाची फुले
….. च्या घरी आज पहिले पाऊल टाकले.
 
 
मंगळसूत्राच्या काळया  पोती मध्ये जोडले सासर माहेर
….. नी केला आज मला सौभाग्याचा आहेर.
 
 
संसार रुपी सागरात डोलते आयुष्याची होडी
सर्वांच्या आशीर्वादाने सुखी राहो…… व…… ची जोडी.

 

 Smart marathi ukhane for female
Smart marathi ukhane for female

 Smart marathi ukhane for female

काळोखी रात्र संपली, उषेचे लागली चाहूल
….. च्या संसारात टाकते पहिले पाऊल.
 
 
नेत्रा तल्या आनंदाश्रुसह माहेर मी सोडले
….. ज्या घरांमध्ये आज पहिले पाऊल ठेवले.
 
 
अवघे जीवन आनंदाने कसे भरभरून आले
….. चे आज मी सौभाग्यवती झाले.
 
 
शांत निरभ्र आकाशात चांदण्यांची झाली बरसात
….. चे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात.
 
 
नागपूरची संत्री आणि नाशिकचे प्रसिद्ध द्राक्ष
….. शी झाला विवाह आज तुम्हा सर्वांचे साक्ष.
 
 
लग्न करीन तर तुमच्याशीच केला होता निग्रह
….. चे नाव घेते आता करू नका आग्रह.
 
 
कोकणात जाताना लागतो वळणावळणाच्या घाट
….. चे नाव घेऊन सोडते भाऊ भावजयीची गाठ.
 
 
पहाटेच्यावेळी दवबिंदू पानावर पसरले
….. ना पाहून मी देहभान विसरले.
 
 
सर्वांना करते नमस्कार, आशीर्वादाचा द्या आहेर
….. च्या साथीसाठी सोडून आले माहेर.
 
 
एकनाथांच्या घरी हरि होतो दास
….. चे नाव घेते तुमच्यासाठी खास.

 

मंगळागौरीच्या वेळी घ्यावयाचे उखाणे | Mangala Gauri Ukhane
 
मंगळागौरीच्या वेळी घ्यावयाचे उखाणे | Mangala Gauri Ukhane
मंगळागौरीच्या वेळी घ्यावयाचे उखाणे | Mangala Gauri Ukhane

Mangala gouri ukhane in marathi for female

श्रावण सरित हिवा साज लेवून सृष्टी देवी सजली,
…… च्या सौख्या स्तव मंगळागौर पुजली.
 
 
सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवाते,
…… ना दीर्घायुष्य मंगळागौरीस मागते.
 
 
श्रावण महिन्यातील सण म्हणजे उत्सवाची पर्वणी,
….. च नाव घेते मंगळागौर कारणी.
 
अशोकवनात सिंह करी गर्जना,
…… सुखी राहूत ही मंगळागौरी कडे प्रार्थना.
 
 
मंगळागौरी मंगल माते वंदन करिते तुला,
…… च नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
 
 
वेलीला शोभे फुल, स्त्रीला शोभे अपत्य,
…… च नाव घ्यायला मंगळागौरीचं निमित्त.
 
 
मोती होऊन सुवर्णाच्या ताटात बसण्यापेक्षा, जलबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान,
…… सोबत केली मंगळागौरीची पूजा महान.
 
 
संसाराच्या रांगणी प्रीतीची चंद्रकोर,
…… च्या सुखासाठी पुजली मंगळागौर.
 
 
सौभाग्यवती चा अलंकार म्हणजे काचेचे चुडे,
….. च नाव घेते मंगळागौरी पुढे.
 
 
प्रत्येक धार्मिक विधी मागे लपलेला असतो खरा अर्थ,
…… च नाव घेते मंगळागौर प्रित्यर्थ.
 
 
वर्षा ऋतूत हसते धरित्री,
….. च नाव घेते मंगळागौरी च्या रात्री.
 
 
निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी,
….. च नाव घेते खास तुमच्यासाठी.
 
 
मेघमल्हार रंगतोय, श्रावण सर कोसळतोय,
…… च्या नावाने मंगळागौर सजते.
 
 
रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,
…… च नाव घेते मंगळागौरी साठी.
 
 
गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,
….. च नाव घेते मंगळागौरी पाशी.
 
 
मंगळागौरी मंगल माते वंदन करते तुला,
…… च नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
 
 
संसाराच्या देवार्यात सुख दुःखाचा खेळ अविनाशी,
….. ना दीर्घायुष्य मागते मंगळागौरी पाशी.
 
 
आयुष्याचा लावीन दिवा, कष्टांचे घालीन भरण,
…… च नाव घ्यायला मंगळागौरीच कारण.
 
 
दसऱ्याला आपट्याची पान हृदय मिलन दर्शविते,
…… ना दीर्घायुष्य मंगळागौरीस मागते.
 
 
समईतील ज्योती, भक्तिभावाने उजळविते,
….. नाव मंगळागौरी पुढे घेते.
 
 
आकाशात दाटून आले मेघ, मोर लागले नाचायला,
…… च नाव घेते मंगळागौरीला.

 

बारसे विशेष | Barshache ukhane in marathi

 

फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे,

…… च्या बाळाचे आज बारसे.

 
गुलाबाचा ताटवा लतांचा कुंज,
…… च्या बाळाची आज आहे मौज.
 
 
गोकुळात कृष्ण सर्वांना झाला हर्ष,
…… च्या बाळाचं आज आहे बारसे.
 
 
दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र,
…… मुळे मला मिळाले मातेच मानपत्र.
 
 
संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल,
…… च्या बाळाची सर्वांना लागली चाहूल.
 
 
मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा,
…… च्या वंशात आला दिप नवा.
 
 
थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले,
……. च्यामुळे आई आज झाले.
 
 
मोत्याची माळ सोन्याचा साज,
…… च्यामुळ आई झाले आज.
 
 
शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी,
…… नाव घेते बाळाच्या बारशाचे दिवशी.
 
 
पंचम सूर म्हणजे संगीताचा साज,
…… रावांच्या बाळाचं बारसं आज.
 
 
हिऱ्याच्या कंठाला, मोत्याचा घाट,
…… च्या बाळाचा बारशाचा थाट.
 
 
जीवनात ही घडी अशीच राहू दे,
…… चेक प्रीती फुल असेच हसू दे.

 
संक्रांत विशेष | sankrat ukhane in marathi for female
 
गोडी घ्यावी मुळापासून स्निग्धता घ्यावी तिळापासून,
…… च नाव घेते आशीर्वाद द्यावा मनापासून.
 
 
संक्रातीच्या शुभ दिने तिळगुळ घ्या बोला गोड,
…… ची लाभली मला संसारात जोड.
 
 
संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराणे ओटी,
…… च नाव घेते खास तुमच्यासाठी.
 
 
स्नेहा मधला मधुर गोडवा टिकावा वर्षभर,
…… च नाव घेते पाळी आली …… वर.
 
 
संक्रातीच्या सनाला येतात नटून बायका,
…… च नाव घेते सर्वजण ऐका.
 
 
तिळगुळ घ्या गोड बोला, संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीन,
…… च नाव घेते प्रेमभाव भक्तीने.
 
 
संक्रांतीच्या सणाला लागतात गाजर, बोरं, ऊस,
…… बरोबर संसारात मी आहे खुश.
 
 
नवीन वर्षाचं स्वागत केलं उत्साहाला आलं उधाण,
…… नाव घ्यायला आज संक्रातीचे कारण.
 
 
भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,
…… नाव घेते संक्रातीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.
 
 
संक्रांतीच्या सणाला करतात हलव्याचा साज,
…… मुळे झाले मी सौभाग्यवती आज.
 
 
आंबे जगन माते वंदन करते तुला,
…… नाव घेते संक्रांतीच्या सणाला.

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment