मैत्री-दोस्ती मराठी सुविचार | Maitri Friendship Quotes In Marathi Status

MarathiStyle.com Daily update Maitri Friendship Quotes In Marathi status Suvichar, Best Friend Status In Marathi, Marathi friendship sms, friendship day quotes in marathi, friendship quotes in marathi shayari, latest marathi suvichar, emotional letter to best friend in marathi, friendship day status in marathi.

Maitri Friendship Quotes In Marathi

 अधिक मित्र हवे असतील, तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

 आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

 आळसा सारखा शत्रू नाही, आत्मविश्वासा सारखा मित्र नाही.

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

 जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…..

 नियमितपणा हा माणसाचा मित्र, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.

 मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

 मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

 मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!

 रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे, तर शत्रूचाही आदर गमावतो.

 सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

 हल्ला करणार्‍या शत्रूला भीऊ नकोस. पण स्तुती करणार्‍या मित्रापासून सावध रहा.

 मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

 शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥ नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र ॥ नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥ दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥

मैत्री सुविचार मराठी Friendship Suvichar in marathi

 निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता. त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते. साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात. तसं मैत्रीचं घडावं. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा.

Best Friend Status In Marathi

 निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण स्वताला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

 जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की, आपलं आयुष्य किती बदललं आहे.

 “मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”

 “कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.”

हे पण वाचा 👇🏻

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

 शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥ नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र ॥ नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥ दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥॥

 मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे.

 दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे….

 मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

 बोलता बोलता काही जण रुसुन जातात… चालता चालता हातातले हात सुटून जातात… म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते… इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात……..

 दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही…..

 शब्दामधे गोड़वा आमच्या रक्तामधे ईमानदारी आणि जर कधी ठरवलच, तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी, आमच्या नादाला लागू नका,… कारण आमचे मित्रच “लय भारी”

 बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा….

 नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते, कधी स्तब्ध तर कधी निरागस होते, भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते, हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

Friendship SMS Marathi

 रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

 श्वासातला श्वास असते मैञी…. ओठातला घास असते मैञी…. काळजाला काळजाची आस असते मैञी…. कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी….

 मैत्री असावी मना-मनाची, मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….

Friendship status in Marathi

 “मैत्री”म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो. ‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो. “मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…

 जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल

 जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

 काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज काही पडली तरच आपला विचार करतात, बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात

मैत्री मराठी सुविचार | friendship status in marathi

 या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत, जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत, कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं. मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं, असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर, हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .

 आपल्या सावलीपासून आपणच शिकावं || कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे. शेवटी काय घेवून जाणार आहोत? म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.

 आयुष्य बदलत असते वर्गातून ओफ्फिचे पर्यंत, पुस्तकातून फाइल पर्यंत, जीन्स पासून फोरमल पर्यंत , पोकीट मनी पासून पगारापर्यंत , प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात

 मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा

 एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा, भुतकाळ विसरायला लावणारा, भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो

 मित्र कमी असावेत पण त्यांना तोड नसावी

 खोटे मित्र असण्यापेक्षा खरे शत्रू असलेले मला चांगले वाटतात

मैत्री-दोस्ती मराठी सुविचार

 कठीण काळ आला म्हणुन आपण निराश का व्हायचे पाषाण फोडुन वर येणाऱ्या पानाकडून मग काय शिकायचे रडायचं नाही, तर लढायचं… !!!

 विश्वास बनून माणसे जीवनात येतात, स्वप्न होऊन मनात घर करून जातात …. सुरुवातीला विश्वास करून देतात कि ती आपले आहेत, मग का कोणास ठाऊक सोडून जातात…

 फुलांची कोमलता, चंदनाचा सुगंध, चांदण्यांची शीतलता, सुर्याच तेज तुझी मैत्री

 सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो …. पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र

 मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात आणि त्या मुले जीवनात चांगली चव येत असते पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असते

 हि आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रुपांतर एका मित्रामध्ये व्हावे, पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्राचे रुपांतर अनोळखी माणसात व्हावे


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , Maitri Friendship Quotes In Marathi | मैत्री-दोस्ती मराठी सुविचार हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment