Marathi Jokes : सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

marathi jokes

मराठी विनोद सर्वोत्तम विनोद ~ Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi, marathi Whatsapp funny jokes, Funny,Husband Wife,Marriage

Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi

रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

Marathi jokes sms

नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.

आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल

फुलटू आगरी इश्टाईल !
फुलटू आगरी इश्टाईल ! देवराम: ए बाला इक्र य. वेटर : क पाजे क तुला? देवराम : १ काॅपी कितीला ह ? वेटर : २० रुपे देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ? वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.

हे पण वाचा 👇🏻

मराठी टोमणे ~ Best Marathi funny quotes ~ jokes status for whatsapp

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!

१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो…!!!

गोलू: २० लाख…!!!

marathi jokes images

Marathi Jokes image

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला

“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?

अगोदर वाईन शाॅप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या

.
आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत….
वेळ प्रत्येकाची येतेच

पोरींनी Miss Call ला इतकं बदनाम केलं आहे की,
.
.
.
चुकून कधी मित्राचा Miss Call आला तरी आई म्हणते…..
‘जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय

Marathi Jokes

आई : बाळ तू खूप मोठा हो…

बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.

काही लोकं आपल्याच नाकात
आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,
नाकातून बोट काढतात
आणि
बोटाकडे अश्या नजरेने पाहतात
जणू काही नाकातून एखादा मोतीच
बाहेर आलाय…!

दुकानदार .काय पाहिजे

गिऱ्हाईक . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे

दुकानदार .सहेबांना एक दारू चा खंबा दे
आणि मुगदाळ दे पाच वाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here