Marathi Jokes : सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

Jokes in Marathi

दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला,” तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल.”

आणि ती एक सीट रिकामीच राहिली !

काळू : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

बाळू : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?

काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
“काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?”
दुकानदार -” हो आहे ना…”
मुलगी – “मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!”

Jokes in Marathi

शेवंताबाईंसोबत लग्न झाल्या दिवसा पासुन बळवंतराव बायकोच्या स्वभावामुळे जीवनाला कंटाळले होते. रोज रोजच्या भांडणापासुन मुक्ती मिळावी या विचाराने ते एक दिवस भांडण चालू असतानाच तडक बाजारात गेले व विषाची बाटली घेऊन आले.

बायको काही ऎकत नाही हे बघुन त्यांनी बाटली फोडली व गटागटा विष पिऊन झोपले. त्यांना वाटले झोपल्यावर विषाचा परिणाम लौकर होणार व त्रासही होणार नाही.

दोन तासांनी बळवंतरावांना जाग आली हे बघुन पुन्हा शेवंताबाईंनी आपली टकळी सुरु केली,”तुमच कोणतही कामा असच असते. आता बघाना आज विष आणल पण काही फायदा झाला का ? …………………………………”

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ….?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?

बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ………!

Jokes in Marathi

सर – homework का नाही केला?

मुलगा – सर लाईट गेले होते.

सर – मेणबत्ती लावायची मग..

मुलगा – काडेपेटी नव्हती.

सर – का?

मुलगा – देवघरात होती.

सर – घ्यायची मग.

मुलगा – अंघोळ नव्हती केली.

सर – का?

मुलगा – पाणी नव्हत.

सर – का?

मुलगा – मोटार चालू होत नव्हती.

सर – का?

मुलगा – आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून….

Jokes in Marathi

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?

मुलगी : एम. जी. रोड

झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!

विनोद खुप झाले. आज चला डोक चालवूया !

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले.

मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले.

…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला.

… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here