Marathi Jokes : सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

Jokes Marathi

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला

नसता… कारण बायकोने विचारले असते…

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

… काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात…

Jokes Marathi

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला,” अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल.”

सुरेखाबाई,” त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?”

प्रगणक,” होय.”

सुरेखाबाई,”तर लिहून टाका ना तेवढेच.”

आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले “कावळ्या ईतके “

नविन नवरा व नविन कुत्रा यात काय फरक आहे ?

नविन कुत्रा एका वर्षाने पण तुमच्याकडे बघुन आनंद दाखवतो…….. !

Jokes Marathi

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.

Jokes Marathi

सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?”

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही.”

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे.

बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो.

बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?

नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !

Jokes Marathi

नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.
नानासाहेब,”डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?”
डॉक्टर,”एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात.”
नानासाहेब,”एक हजार जरा जास्तच वाटतात.”
डॉक्टर,”होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात.”
नानासाहेब,”अजुन कमी होतात का बघाना ?”
डॉक्टर,”ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?”
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,”हिचे दात काढायचे होते.”

सर – homework का नाही केला?

मुलगा – सर लाईट गेले होते.

सर – मेणबत्ती लावायची मग..

मुलगा – काडेपेटी नव्हती.

सर – का?

मुलगा – देवघरात होती.

सर – घ्यायची मग.

मुलगा – अंघोळ नव्हती केली.

सर – का?

मुलगा – पाणी नव्हत.

सर – का?

मुलगा – मोटार चालू होत नव्हती.

सर – का?

मुलगा – आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here