Marathi Jokes : सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

Marathi funny jokes

खमक्या मालतीबाई पेंटर पुढे बसल्या होत्या व पेंटर त्यांचे चित्र काढत होता. मधेच त्या पेंटरला म्हणाल्या ,”हे बघा, माझ्या चित्रात छान हिर्‍याची अंगठी, सुंदर नेक्लेस, अप्रतीम सुंदर मंगळसुत्र व अजुन काही दागीने दाखवता अलेत तर दाखवा.”

“पण तुम्ही यातल कहिच घातलेल नाही.” पेंटर म्हणाला.

मालतीबाई,” तरिही दाखवा. मला माहितेय मी मेल्यावर हे नक्किच दुसर लग्न करणार तेंव्हा माझा हा फोटो बघुन ती यांना सुखाने जगु देणार नाही.”

एका शिशू वर्गात एकदा बाईंनी मुलांना सांगितल, तुम्हाला आवडेल ते चित्र काढा.

सर्व मुलांनी लगेच दिलेल्या कागदांवर चित्रे काढायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने वर्गात चक्कर मारताना बाईंनी एका मुलीचे चित्र बघितले व विचारले हे काय काढते आहेस तु ?

मुलगी,”बाई मी देवाचे चित्र काढते आहे.”

बाई,”पण देव कसा असतो हे कुणालाच माहित नाही.”

मुलगी,” थोड थांबा मी चित्र काढल्यावर कळेलच देव कसा असतो ते. “

Marathi funny jokes

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,”अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?”

पायलट म्हणाला, “खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”

वत्सलाबाईंनी बबनरावांना विचारले,” आज रात्री जेवायला काय करु ?”
बबनराव, “छान कांद्याचे थालीपीठ करतेस का ?”

वत्सलाबाई, “हो करते, बरेच दिवसात केले नाहित ना ?”

वत्सलाबाई स्वयंपाक घरात गेल्यावर थोड्या वेळाने बबनराव पण तिकडे गेले.

अग अग कांदा बारिक चिरलास ना ? आणि हो त्यात थोडे तिळ पण घाल. आणि ऎकल का मोहन जरा जास्तच घाल थालीपीठ छान खुसखुशीत होतात. तव्यावर पण थोडे तेल जास्त लाव बर का .

वत्सलाबाई चिडल्या व म्हणाल्या मला काय थालीपीठ येत नाहित काय ?

मला काय कार चालवता नाही येत का ?

Marathi funny jokes

दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,”सर, काही मदत हविय का ?”

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले,” अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे”

सांता : अरे बांता इतके दिवस कुठे गेला होतास ?

बांता : अरे मी श्रमदान करायला गेलो होते.

सांता : श्रमदान ? कुठे ?

बांता : जेल मधे . अरे मला सहा महिने सश्रम कारावास झाला होता ना.

Marathi funny jokes

“तु माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का ?” मंगेश.

साधना,”मी तुला या अगोदरच सांगितले आहे. मी तयार नाही.”

“मी दोन दिवस वाट बघतो. अन्यथा मी विहार लेक मधिल बर्फात मधोमध एक भोक करणार व त्यात स्वत:ला बुडवून घेणार.” मंगेश.

साधना,”अरे, मुंबईत इतकी थंडी कधिच नसते कि विहार लेक मधिल पाण्याच बर्फ होईल.”

“तर मी अशी थंडी पडायची वाट बघणार.”

राजू : अरे विजू, तुला कधि कोणी मुर्ख भेटलाय ?

विजू : मी खुप प्रयत्न केला पण आज तुला टाळू शकलो नाही.

काल, एका माणसाने दोन किलो कांदे आणले.

आज : त्याच्या घरावर आयकर अधिकार्‍यांनी धाड घातली. इतके पैसे कुठून आणले हे बघायला !

आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.

आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस सांगतात.

याला म्हणतात नशिब.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here