मराठी म्हणी व त्यांचे अर्थ ~ Marathi Mhani Arth olkha 200+

marathi mhani whatsapp mhani
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ ~ Marathi Mhani 200+
 

Marathi mhani, Mhani in marathi, marathi mhani olkha, Marathi mhani list, Marathi mhani with meaning, Marathi mhani whatsapp, Marathi mhani puzzle, Marathi mhani ukhane,

Mhani in Marathi

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ ~ मनोरंजक म्हणी
 
१) पळस गेला घाटा, तीन पाने देठा!
अर्थ: ज्याच्या जे नशिबी असेल तेच त्याला मिळावयाचे. पळसाची पाने त्रिदळीच असावयाची. स्थलांतर करून तो दुसरीकडे कोठे गेला म्हणून तीन दळांऐवजी त्याला जास्त दळे येणार आहेत थोडीच ?
 
 
 
२) दैव देते अन् कर्म नेते!
अर्थ : पुष्कळदा नशिबाने धनसंपत्ती किंवा सुखसोयी प्राप्त झाल्या असूनही माणसे आपल्या कृतीने त्या गमावून बसतात.
 
३) ज्याचे जळे त्याला कळे!
अर्थ: ज्याला स्वत:ला एखाद्या बाबतीत झीज लागलेली असते त्यालाच तिचे महत्त्व समजते.
 
 
 
४) ऐकावे जनाचे, करावे मनाचे!
अर्थ : दुसर्यांचा उपदेश ऐकायला काही हरकत नाही, पण कोणतेही कार्य करताना आपल्या मनाला पटेल असेच करावे. कारण नाना प्रकारचे लोक नाना प्रकारे उपदेश
करतील. त्यात योग्य अयोग्य उपदेश कोणता हे आपले आपणच ठरविले पाहिजे.

Mhani in marathi

५) दाम करी काम, बिब्बी करी सलाम!
अर्थ: पैशाच्या जोरावरच सर्व कामे करता येतात. पैसा जवळ असला तर कुठे काही अडत नाही. पैशाच्या जोरावर राजाच्या राणीपर्यंत वशिला पोचविता येतो.
 
 
 
६) मनी वसे ते स्वप्नी दिसे!
अर्थ: माणसाला ज्या गोष्टींचा ध्यास लागला असेल, त्याच त्याला सर्वत्र दिसतात. स्वप्नातही त्याच गोष्टी त्याच्या नजरेपुढे नाचतात.

 

७) चिंती परा, ते येई घरा!
अर्थ: आपण दुसऱ्या माणसांबद्दल ज्या प्रकारच्या इच्छा करू, तशाच आपल्याही वाट्याला येतात. दुसऱ्याचे हित चिंतले तर आपलेही हित होते, दुसऱ्याचे अहित इच्छिल्यास आपलेही अहित होते.
 
 
 
८) बळी तो कान पिळी!
अर्थ :अंगी सामर्थ्य असण्यावरच सर्व गोष्टी अवलबून असतात. ज्याच्या अंगात सामर्थ्य असेल तो दसऱ्या माणसांना ती न ऐकतील तर, त्यांचा कान धरूनही आपल्या मनाप्रमाणे वागायला लावतो
 

Mhani in marathi

९) बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा!
अर्थ: मुले ही थोडीतरी त्यांच्या आईबापांच्या बळणावर जायचीच कुभार जसा जाडजूड किंवा किरकोळ शरीराचा असेल तशीच त्याच्या हातून भांडी होणार.
 
 
 
१०) खाण तशी माती, जाती तशी पुती!
अर्थ: ज्या जातीच्या मातीची खाण असेल, तिथे त्याच जातीची माती निघायची. मुली साधारणत आईच्या वळणाच्याच असायच्या.
११) अडला हरी, गाढवाचे पाय धरी!
अर्थ: अगदी नाइलाज झाला म्हणजे क्षुद्र माणसाच्या पायधरण्या करण्याचाही थोरामोठ्यावर प्रसंग येतो
 
 
 
१२) असतील बाळ, तर फेडतील काळ!
अर्थ :आपण कष्टात दिवस काढीत असलो तरी आपणास मुलगे असल्यास ते तरी त्यांच्या मोठेपणी आपणांस सुखात ठेवतील, अशी आपल्याला आशा वाटत असते.
 

Mhani in marathi

१३) करावे तसे भरावे!
अर्थ :आपण जशी कती करू तशी तिची फळे आपल्या वाट्यास येतात
 
 
 
१४) जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण।
अर्थ: काही निमित्ताने आपल्याला मोठेपण आले असले म्हणजे त्या मोठेपणाला शोभेल असे वागणे खूप जड जाते.
 
 

 

१५) भित्यापाठी ब्रह्मराक्षस!
अर्थ: मनुष्य भित्रा असला म्हणजे त्याला सगळीकडेच भीतिदायक वातावरण दिसते. शांत अशा वेळी तो चालत असता त्याच्याच पायांचा आवाज झाला तरीसुद्धा मागे कोणी आले की काय असे त्यास वाटते.
 
 
 
१६) पिंडी ते ब्रह्मांडी!
अर्थ: शरीरात जशी देवतांची व्यवस्था असते तशीच विश्वात असते. ईश्वराचे अस्तित्व अणुरेणूत असते.
 

Mhani in marathi

१७) शितावरून भाताची परीक्षा!
अर्थ: मनुष्याचा स्वभाव हा सर्वत्र सारखाच आहे. म्हणून आपल्यावरून जग पारखावे म्हणतात. एका नमुन्यात जे दिसले तेच मालाच्या सबंध राशीत दिसून येणार
 
 
 
१८) असेल हरी, तर देईल खाटल्यावरी !
अर्थ :ईश्वराचे साह्य असेल तर मनातल्या इच्छा बसल्या जागीच तृप्त होऊ शकतात.
 
 
१९) ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी!
अर्थ :आपण ज्याचे अन्न खाले असेल, आपण ज्याचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे मध्ये असू त्याच्या बाजूला आपणास बोलावे लागते.
 
 
 
२०) आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही!
अर्थ: स्वतः अनुभव घेतल्याशिवाय खरे काय ते कळत नाही. ऐकीव गोष्टींनी सत्यस्थिती समजत नाही.
 

 

२१) हातच्या काकणाला आरसा नको !
अर्थ: ज्या अगदी उघड उघड दिसणार्या गोष्टी असतात, त्या मुद्दाम दाखवाव्या लागत नाहीत.
 
 
 
२२) बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!
अर्थ: मूल पूढे कसे होणार आहे त्याची लक्षणे त्याच्या अगदी बालवयापासून दिसू लागतात.
 

 

२३) नावडतीचे मीठ अळणी!
अर्थ: आपल्याला जो मनुष्य आवडत नसेल त्याचे कोणतेच करणे आपणांस आवडत नाही. त्याला असतील-नसतील ते दोष आपण चिकटवितो. नावडत्याबायकोच्या करण्यात काहीतरी खोड काढायचीच म्हणून तिने वाढलेले मीठही
अळणी म्हणजे खारटपणा नसलेले असे आहे असेही एखादा नवरा म्हणतो.
 
 
 
२४) ज्याचे करावे बरे, तो म्हणतो माझेच खरे!
अर्थ: एखाद्याला त्याच्या हिताची गोष्ट सांगायला आपण गेलो तरी तो आपलाच हव चालवितो. त्याला केलेल्या उपदेशाचे चीज होत नाही
 
Marathi Mhani
२५) कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई!
अर्थ :आपले काम साधण्यासाठी माणसे कशी गोडगोड बोलतात त्याचा यात इशारा आहे. ‘मामा’ म्हणून काहीतरी काम करवून घ्यायचे आणि ‘आजीबाई म्हणून ताक मिळवायचे हे प्रकार नेहमी घडतात
 
 
 
२६) गरज सरो अन वैद्य मरो!
अर्थ: आपले काम एकदा भागले की ते पार पाडण्यास मदत करणाऱ्याचीही आपणांस आठवण राहत नाही. ‘तो गेला तरी चालेल’ असे म्हणण्याइतकीही आपली मजल जाते.
 
 
२७) घर फिरले म्हणजे वासेही फिरतात !
अर्थ: घराने एका बाजूचे तोंड दुसरीकडे केले की वासे हे घराचाच एक भाग असल्यामुळे त्यांचीही तोंडे फिरतात, घराच्या मालकाचे मन आपल्याबद्दल कलुषित झाले की त्याच्या घरची इतर माणसेही आपली हेटाळणी करू लागतात.
 
 
 
२८) चोराच्या मनात चांदणे!
 
अर्थ: ज्याला ज्याची भीती विशेष असेल त्याचे नाव एकसारखे त्याच्या मनात घोळत राहते. चांदण्यात चोर पकडला जाण्याची शक्यता जास्त, म्हणून ‘चांदणे पडते की काय’ अशी त्याला एकसारखी भीती वाटत असते.
 

Marathi Mhani

२९) बुडत्याचा पाय खोलात!
अर्थ: बुडून मरण्याचेच ज्याच्या नशिबी असेल अशा माणसाला कशाचाही आधार वेळेवर मिळत नाही. त्याने किनारा जवळ आला असे समजून, दमल्यामुळे जमिनीवर पाय टेकू पाहावे, तो तेथेच नेमके खोल पाणी असते
 
 
 
३०) लेकी बोले सुने लागे!
अर्थ : मुलगी आणि सून या दोन्ही मुलीच असल्यामुळे आपल्या मुलीला उद्देशून बोलले तरी ते सुनेलाही लागू पडते. तिला निराळे बोलावे लागत नाही.
 

 

३१) मोठे तितके खोटे!
अर्थ :एखाद्याचा जेवढा नावलौकिक मोठा असतो, तितकीच त्याची अंडीपिल्ली किंवा गुप्त लफडीही जास्त असतात
 
 
 
३२) दिव्याखाली अंधार!
अर्थ :दिव्याचा प्रकाश हवा तितका दूर जरी पडत असला तरी त्याच्या बुडाखाली मात्र काळोख असतो. मोठ्या लौकिकवानाच्या बुडाखाली ऊर्फ घरातच त्यांना कमीपणा आणण्यासारखी काळी कृत्ये घडत असतात
 
Marathi Mhani
३३) धर्म करता कर्म उभे राहते!
अर्थ: उपकार करायला, कोणाच्या उपयोगी पडायला जावे तो आपणच अडचणीत सापडायची वेळ येते.
 
 
 
३४) शहाण्याला मार शब्दांचा!
अर्थ खरोखर जो मनुष्य शहाणा आहे त्याला नुसते चार शब्द बोलले तरी तेवढ्याने काम भागते अधिक काही करावे लागत नाही
 
Marathi Mhani
३५) देश तसा वेश!
अर्थ: ज्या देशात राहतो तेथे तेथल्या लोकाप्रमाणे पोषाख वगैरे बहिरंग ठेवावे. म्हणजे आपण लोकांच्या डोळ्यात भरत नाही किवा सलत नाही.
 
 
 
३६) खाली मुंडी, पाताळ धुंडी!
अर्थ: काही माणसे वरवर दिसायला अगदी गरीब व साळसूद दिसतात. तरीपण आतून मात्र ती मोठी कारस्थानी व पाताळयंत्री असतात.
 
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , आपल्याला मराठी म्हणी व त्यांचे अर्थ ~ Marathi Mhani Arth olkha 200+ हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻
 

Marathi mhani, Marathi mhani list, Marathi mhani with meaning, Marathi mhani whatsapp,

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here