मराठी सुविचार ~ Marathi Suvichar | सुंदर विचार | Sundar Vichar | Quotes

whatsapp marathi suvichar

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

good morning suvichar marathi images

marathi suvichar

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू
नका.

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

ऎकावे जनाचे करावे मनाचे.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान
हवं.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे
शिकणे हीच विद्या !

marathi suvichar images

Suvichar in marathi

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे
योग्य.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here