मराठी सुविचार ~ Marathi Suvichar | सुंदर विचार | Sundar Vichar | Quotes

Marathi suvichar thought

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली
असते.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात
असतं.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला
शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया,
क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित
आहे.

marathi suvichar education

Marathi thought

क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार
करावेच लागतील.

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

वैभव त्यागात असते, संचयात नाही.

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास
ठेवा.

खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही
की फसवत नाही.

ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध
रहा.

marathi thoughts

Suvichar in Marathi

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा
लागतो.

कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here