Marathi Suvichar For Self Confidence | आत्मविश्वास वाढवणारे सुविचार

self confidence quotes in marathi suvichar

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज marathi suvichar,self respect quotes in marathi,marathi quotes,self respect in marathi,sangharsh quotes in marathi,
self confidence quotes in marathi,attitude quotes in marathi,suvichar marathi arth,
अपडेट आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी सुविचार मिळतील.जीवन जगत असताना आपल्याला भरपूर संकटे येतात आणि जातात पण त्यामधून खचून न जाता आपल्याला आत्मवश्वासपूर्वक आणि आनंदमय जीवन जगता आले पाहिजे.त्यासाठी आपल्याला हे वाचून आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे तसेच आपल्या मित्रांना पण ही पोस्ट शेअर करावी

Marathi Suvichar On Self Confidence

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.

कलेची पारंबी माणसाला बळ देते.

काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.

काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्‍या होतात.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

 गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.

गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

 चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

self respect quotes in marathi

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

 जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

 जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

हे पण वाचा 👇🏻

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

 त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात

दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.

धैर्य धरणार्‍याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.

आत्मविश्वास वाढवणारे सुविचार | Marathi Suvichar For Self Confidence
Marathi Suvichar For Self Confidence

ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

ध्येयाचे सुप व्यवहाराच्या शेणाने सारवावे लागते.

ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.

नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ.

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.

 परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.

प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

self respect quotes in marathi

 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

मनाची परिक्षा डोळ्यानी होते, तर डोळ्याची परिक्षा मनाने होते.

मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे.

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

मनुष्य गुणाने रुपवान असला म्हणजे कुरुपही रुपवान दिसतो.

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.

माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.

माणुस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धाराने शोभून दिसतो.

मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करीत नाहीत.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला,स्वतःसाठी,स्वतःकङून नेमके काय हवे आहे,हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्‍या चढाव्या लागतात.

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

वाचन हे मनाचे अन्न आहे.

 वाचनासाठी वेळ काढा, तो शहाणपणाचा निर्झर आहे.

 विचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे,कृतीमुळे सवय लागते,सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.

 विचारांच्या जोरावर अन् ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही.

 विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.

 विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.

 विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.

marathi self confidence suvichar

 विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृती.

 विश्वासामुळे माणसाला बळ येते.

 वैभव त्यागात असते, संचयात नाही.

 व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

 शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

 संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

 संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.

self respect quotes in marathi
self respect quotes in marathi

 सत्‌ पुरुषांच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, यासांरखा नीती शिक्षणाचा दुसरा मार्ग नाही.

 सत्याने मिळतं तेच टिकतं.

 समाज तुम्हाला कधीही आधार देणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला मदत करायला शिकाल, तेव्हाच तुम्हाला समाजाचा आधार लाभेल.

 सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

 सुख बाहेर आहे, आनंद आंत आहे.

 स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

स्वतःची चिंता न करता जो दुसर्‍याची चिंता करतो तोच खरा संन्याशी.

 हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .

 होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.

 कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा

 आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

 नेहमी आपल्या वास्तविक रूपात रहा स्वतःला व्यक्त करा स्वतः मध्ये विश्वास ठेवा बाहेर जावून कुठल्या तरी यशस्वी व्यक्तीला शोधू नका आणि त्यांची नक्कलही करू नका कारण तुम्हीही यशस्वी होणार आहात यावर कायम विश्वास ठेवा.

Marathi confidence suvichar

 गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणार्यांना कधीच मनमुराद पणे आनंद लूटता येत नाही…

 आगीत हात घातला तर भाजेल हे ऐकून, वाचुन कळतं त्यासाठी आपण हात भाजुन घ्यायला नको. आणि अनुभव घेण्यासाठी कधी कधी दुसर्‍यांचे अनुभवही कामी येतात. नुसतं वाचणं आणि त्या लेखकांची अनुभुती समजून घेऊन ती भावना, त्याचं गांभीर्याने म्हणणं समजून घेणं यात फरक आहे.

 फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.

 कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

 स्वतःची यतार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो.

 “आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका ..म्हणजे अगदी स्वतःचाही ….. कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही परत मिळवू शकाल ..पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं “

 “विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”

 “दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक,सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक. परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग.”

 “नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”

marathi quotes

 ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

 जर देव तुमच्या प्रार्थनेला लगेच फळ देत असेल, तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढवत आहे. जर देव तुमच्या प्रार्थनेला काही काळाने फळ देत असेल, तर तो तुमचा संयम वाढवत आहे. जर देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल, तर तो तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप छान तयार करत असेल.

 जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..

 जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.

 रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.

 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..

guru quotes in marathi

 आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रूतून उभं राहायचं, प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्या वेगाने निघून जातं, आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाच असतं

 “एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”

 आज आपण जिथवर पोहोचलो त्याचा अभिमान जरूर बाळगा . जिथवर पोहोचायचे ठरवले आहे , तिथवर नक्की पोहोचणार आहोत त्याचा विश्स्वासहि जरूर बाळगला पाहिजे

 खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते

 नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते

 मी या जगात साधारण म्हणून जगायला आलेलो नाही

 आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच तुम्हाला जगण्याचे कारण देतील

मला आता नवीन टिकाकारांची गरज आहे कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत

 शिस्त म्हणजे तुमचे चांगले चिंतणारा मित्र आहे जरी त्याचे शब्द कितीही कठोर असले तरीही

 रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते

आत्मविश्वास वाढवणारे सुविचार | Marathi Suvichar For Self Confidence

 मी अशी फार थोडी महान माणसे पहिली आहेत ज्यांचा भूतकाळ संघर्षमय नव्हता

फक्त परिणामांकडे बघू नका, आपल्याला तेच मिळत ज्याचे आपण लायक आहोत

 जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलाच बरे

 स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील

 काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते

 जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल

 न हरता …. न थकता …. न थांबता … प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत

 चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो

 कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर चांगुलपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी !

 तुम्ही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या बरोबर नसाल तर मी तुम्हाला माझ्या यशात सामील करून घेईन याची अपेक्षाही माझ्याकडुन करू नका

 आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , आत्मविश्वास वाढवणारे सुविचार | Marathi Suvichar For Self Confidence हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment