नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे ~ Marathi Ukhane for Female

marathi ukhane for female

Marathi ukhane for female, Marathi ukhane, ukhane in marathi, ukhane marathi, marathi ukhane for female, ukhane in marathi for female, smart marathi ukhane, marathi ukhane for bride, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, ukhane in marathi comedy, marathi ukhane funny, marathi ukhane list, long marathi ukhane for female, latest marathi ukhane, smart marathi ukhane female, funny marathi ukhane, Marathi Ukhane for Male Click Here

Marathi Ukhane for Female

नवरीसाठी उखाणे

 सुख-दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले

……. रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले.

अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य,
…………रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……….. रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

नवीन निघाली कादंबरी वाचन करते पूरी,
…….रावांचे नाव घेते……..च्या घरी.

आईचे वळण, वडिलांचे शिक्षण,
……… राव पती मिळाले हेच माझे भूषण,

क्षणाची विद्युलता ब्रह्मांड उजळी,
……….. चं नाव घेते …….. च्या वेळी.

पावसाच्या पहिल्या सरीने भिजते चातकाची काया,
………… च्या साठी सोडले आई-वडिलाचे घर, तरी सुटत नाही माया.

वसंत ऋतूत कोकिळा करते गुंजन,
…….. रावण सह करते…….पूजन,

गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,
……… रावांच्या संसारात आहे मी दंग.

चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा,
……. रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा.

वसंत ऋतुच्या आगमनाने शितल होते धरणीची काया
……..रावांचे नाव घेऊन पडते…… च्या पाया.

New marathi ukhane


लोकनाट्यातील प्रकार आहे सवाल-जवाब,
……… रावांचा आहे……. तालुक्यात मोठा रुबाब.


चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.

हिंदूस्थान देशात सोन, चांदी, हिरे, मोती महागले,
………. रावांसारखे रत्न हाती लागले.
सासू माझी मायाळू, दीर आहेत हौशी,
……. रावांचे नाव घेते……… दिवशी.

हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला,
…….रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला.

सासराला जाताना सोडावे लागे माहेर,
…….राव जीवनात मला प्रीतीचा आहेर.

महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले,
…….. च्य जीवासाठी आई-वडिल सोडले.

उभी होते तळ्यात, नगर गेली मळ्यात,…….हजाराची कंठी,
…………. रावांच्या गळ्यात.

नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,
……..रावांच नाव घेते ……..दिवशी,

आईच्या प्रेमाची सर नाही कुणाला,
…….चे नाव घेते सांगाल त्या वेळेला.

सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
…….. चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.
 
पुढील पानावर आणखी भरपूर मराठी उखाणे आहेत…
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here